
# बुधवारपासुन बससेवा करण्याचे आश्वासन!
संदेश क्रांंती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील )
खानापूर तालुक्यातील आंबोळी कबनाळी तसेच पाली या गावच्या बसच्या समस्या गेल्या कित्येक वर्षापासुन तशाच आहेत. बाबत खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी यानी डेपो मॅनेजर यांच्याशी चर्चा करून आंबोळी ,कबनाळी तसेच पाली भागातील विद्यार्थी व लोकांच्या समस्या बससेवा सुरळीत नसल्याने उदभवतात .खानापूर तालुक्याच्या ठिकाणी हायस्कूल ,काँलेजला येण्यासाठी वेळेत बस येत नाही. तेव्हा ही समस्या ताबडतोड सोडवावी.अशी सूचना खानापूर डेपो मॅनेजरना केली.
यावेळ डेपो मॅनेजरनी उद्या बुधवार दि.६ पासून बस चालू करण्याचे आश्वासन दिले
यावेळी खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी , ग्राम पंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर ,संजू चौगुले ,डाॅ.डी.ई .नाडगौडा,गणपत मोटेकर तसेच ग्रामस्थ आदी उपस्थित होते.