
#बुधवारी सायंकाळी झाला आपघात!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर पारिश्वाड रस्त्यावरील यडोगा क्राॅसवर केएसआरटीसी बस व दुचाकीची समोरासमोर जोराची धडक होऊन झालेल्या आपघातात दोड्डहोसुरचा दुचाकी स्वार जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी दि.२७ रोजी सायंकाळी घडली. ठार झालेल्या युवकाचे नाव संदेश उर्फ गोविंद गोपाळ तिवोलकर ( वय २५ )असुन तो अविवाहित होता.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, खानापूर केएसआरटीसी डेपोची बस चापगावहुन यडोगा मार्गे खानापूरला येत होती.
तर दोड्डहोसुरचा युवक दुचाकीवरून दोड्डहोसुरला जात होता.यडोगा क्राॅसजवळ दुचाकीची जोराची धडक बसला बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच खानापूर पोलिसानी घटना स्थळी धाव घेतली. पोलिस निरीक्षक मंजुनाथ नायक यानी पंचनामा करून मृतदेह खानापूर सरकारी दवाखान्यात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला.
सदर युवक मालवण (महाराष्ट्र) येथे गवंडी कामासाठी होता.काही कामानिमित्त तो गावाला आला होता. त्याच्या पश्चात आई वडील ,भाऊ ,बहिण असा परिवार आहे.
युवकाच्या आपघाती मृत्यूने दोड्डहोसुर गावावर शोककळा पसरली आहे.