
#सर्वानुमते निवड!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
गर्लगुंजी ( ता.खानापूर ) येथील प्राथमिक कृषी पत्तीन सोसायटीच्या ( पी के पी एस) चेअरमन पदी संजय शंकर पाटील तर व्हाईस चेअरमन पदी विनोद विठ्ठल कुंभार याची सर्वानुमते निवड करण्यात आली.
सोसायटीच्या सभा गृहात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी नंदगड मार्केटींग सोसायटीचे चेअरमन गोपाळ पाटील होते.
यावेळी माजी तालुका पंचायत सदस्य पांडुरंग सावंत यांनी प्रास्ताविक करून उपस्थितीतांचे स्वागत केले. यावेळी कमिटीच्यावतीने सर्वानुमते चेअरमन पदी संजय शंकर पाटील तर व्हाईस चेअरमन पदी विनोद विठ्ठल कुंभार याची निवड जाहिर करण्यात आली.
यावेळी गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, राजू सिध्दाणी, नुतन चेअरमन संजय पाटील ,हणमंत मेलगे आदीनी सोसायटीच्या प्रगती बदल विचार मांडले.
यावेळी सोसायटीचे चेअरमन संजय पाटील, व्हाईस चेअरमन विनोद कुंभार, संचालक गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत , सुभाष पाटील, राजू सिध्दाणी,हणमंत मेलगे, गंगाराम मेलगे, नागेश तलवार, सौ.शामल संतोष पाटील,सौ.महादेवी गुंडू सिध्दाणी आदी उपस्थित होते.