
#अस्वलासह दोन पिल्लाचा हल्ला!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
चिगुळे ( ता.खानापूर ) गावचा शेतकरी विलास हेमाजी चिखलकर ( वय ५५) हा नेहमी प्रमाणे रविवारी दि.३० रोजी सकाळी आपल्या शेतात गेला होता.
त्याने शेतात विश्रांतीसाठी झोपडी बांधली होती. नेहमी प्रमाणे शेतकर्याने झोपडीत प्रवेश केला.आदीच त्या झोपडीत अस्वल आपल्या दोन पिल्लासह बसले होते. शेतकर्याने झोपडीत प्रवेश करताच अस्वलाने शेतकर्यावर हल्ला केला. सोबत दोन पिल्ले असल्याने अस्वलाने जोराचा हल्ला करून गंभीर जखमी केले. मात्र शेतकर्याने प्रतिकार करून अस्वलाच्या तावडीतुन गंभीर जखमी अवस्थेतुन आपली सुटका करून घेतली.
अस्वलाने शेतकर्याच्या डाव्या बाजुच्या तोंडाची बाजु फाटुन काढली.त्याचबरोबर हातापायाला तसेच शरीराच्या काही भागाला गंभीर दुखापत केली होती.
तसल्या गंभीर जखमी अवस्थेत शेतकरी विलास हा गावाकडे धावत सुटला.याचवेळी रस्त्याने जाणार्या दुचाकी स्वाराने याची वनखात्याला दिली.
लागलीच अँम्बूलन्स मागवुन त्या शेतकर्याला उपचारासाठी बेळगाव सिव्हील हाॅस्पिटलमध्ये पाठविण्यात आले.लागलीच डाॅक्टरनी प्रथमोपचार करून त्या शेतकर्याला केएलई हाॅस्पिटल मध्ये दाखल केले. के एल ई मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मान येथील शेतकर्यावर अस्वलाने हल्ला करून त्याला कायमचे अपंग केले. ही घटना ताजी असताना रविवारी चिगुळे गावच्या शेतकर्यावर अस्वलाचा हल्ला झाल्याने जंगल भागातील नागरीकावर जंगली प्राण्याचे हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत. लोकप्रतिनिधी संबधीत शेतकर्याला शासनाकडुन नुकसान भरपाई मिळवुन द्यावी.अशी मागणी या चिगुळे भागातील नागरीकातुन होत आहे.