
#तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड घाडी यानी दिली पत्रकार परिषदेत माहिती.
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात भाजपच्या पदाधिकार्याने महिला बाल कल्याण खात्याचा बनावट सरकारी लेटरपॅड व शिक्का बनवुन तालुक्यातील पाली व मळव गावच्या दोन महिलाना अंगणवाडी शिक्षिकेची नियुक्ती पत्रे दिली होती.
मात्र ती बनावट असल्याची माहिती खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी यानी काॅग्रेस पक्षाच्यावतीने बोलविण्यात आलेल्या पत्रकार परिषेदत दिली.
यावेळी बोलताना अँड ईश्वर घाडी म्हणाले की तालुक्याच्या पाली व मळव गावच्या अंगणवाडीत जागा भरण्याच्या होत्या. त्यासाठी गावातील काही महिलानी अर्ज केले होते.
याच फायदा घेऊण भाजपचे नेते आकाश अथणीकर यानी अंगणवाडीत नोकरी लावतो म्हणून पाली व मळव येथील दोन महिलांच्याकडुन काही रक्कम व कागद पत्र घेतली. व महिला बाल कल्याण खात्याचे बनावट लेटर पॅड व खोटे शिक्के तयार करून नियुक्ती पत्र दिले होते.
मात्र दोन्ही गावच्या अंगणवाडीत सरकार नियुक्त महिलाची नेमणुक करण्यात आली .
त्यानंतर त्या महिलाना आपली फसगत झाली .म्हणून आकाश अथणीकर यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता झालेला प्रकार उघडकीस आला.
लागलीच काॅग्रेसच्या पदाधिकार्याना संपर्क करून याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली.अशी माहिती अँड घाडी यानी दिली.
यावेळी ते म्हणाले अथणीकर हे वकील नसताना कोर्ट आवारात काळा कोट घालुन वावरत होता.त्याला कोर्टात काळा कोट घालुन मज्जाव ही केला होता असे सांगीतले.
यावेळी काँग्रेस नेते सुरेश जाधव म्हणाले की आकाश अथणीकर यांच्यावर अनेक फसवणीची प्रकरणे आहेत.याबाबत खानापूर पोलिसानी त्याच्यावर सुमोटो कारवाई करावी.अन्यथा पोलिस प्रमुखाकडे तक्रार करणार असल्याचे त्यानी सांगीतले.
यावेळी पत्रकार परिषदेला खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी,शहर अध्यक्ष महातेश राऊत , काॅग्रेस नेते सुरेश जाधव ,महादेव कोळी,जाकी फर्नाडिस,नगरसेवक इसाक पठाण,लक्ष्मण मादार,तोहीद चांदखन्नावर,रामचंद्र पाटील,सावित्री मादार, दीपा पाटील,वैष्णवी पाटील,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.