
#काॅग्रेसच्या पत्रकार परिषदेत केला प्रश्न !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
लैला शुगर्सचा सन २०२४-२५ सालाचा गळीत हंगामाला तब्बल महिणा उशीर झाला. त्यातच उसाचा दर जाहिर करावा.असा खानापूर तालुका काॅग्रेस पक्षाच्यावतीने बोलविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी यानी प्रश्न उपस्थित केला.
प्रारंभी शहर अध्यक्ष महातेश राऊत यानी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी बोलताना तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी म्हणाले की, खानापूर तालुक्यात उस उत्पादनाचे प्रमाण दिवसेदिवस वाढत आहे. परंतु लैला साखर शुगर्सने तब्बल महिना गळीत हंगामाला उशीर केला.
हा साखर कारखाना तालुक्यातील शेतकर्यांचा आहे. श्री महालक्ष्मी ग्रुप तोपिनकट्टीने भाडे तत्वावर घेऊण उशीरा गळीत हंगामाला सुरूवात केला.दर ही जाहिर केला नाही. शेवटी उस शिल्लक राहिला तर याला जबाबदार कोण? असा सवाल यावेळी करण्यात आला.
ऐवढेच नव्हे तर भाग्यलक्ष्मी साखर कारखाण्याचे संस्थापक माजी आमदार निळकंटराव सरदेसाई याचा पुतळा उभारण्याचे आस्वासन दिले होते. ते ही राहुन गेले.
मागील गळीत हंगामात विधान सभा निवडणुकीच्या तोडावर उस उत्पादकाना जादा दर देण्याची घोषणा केली.उस उत्पादकाना अँडव्हान्स देण्याची तरतुद केली होती.मात्र यावर्षी गळीत हंगामाला तब्बल महिना उशीर झाला.गळीत हंगामाकडे मात्र दुर्लक्ष झाले ? असा प्रश्न उपस्थित केला.
यावेळी काॅग्रेस नेते सुरेश जाधव,केपीसीसी सदस्य महादेव कोळी ,जाॅकी फर्नाडीस ,महांतेश महांतेश राऊत यानी ही आपले विचार मांडले.
यावेळी पत्रकार परिषदेला नगरसेवक तोहिद चांदखन्नावर,लक्ष्मण मादार,इसाक पठाण,गुड्डू टेकडी,रामचंद्र पाटील ,सावित्री मादार, दीपा पाटील वैष्णवी पाटील आदी काॅग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.