
#आम आदमी तालुका अध्यक्ष भैरू पाटीलसह सदस्यांचा प्रेवश!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर तालुका काॅग्रेस पक्षाच्यावतीने खानापूर तालुका आम आदमीच्या पदाधिकार्याचा काॅग्रेस पक्षात प्रेवश कार्यक्रम शिवस्मारक चौकातील सभागृहात मंगळवारी पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहर अध्यक्ष महांतेश राऊत होते.प्रमुख उपस्थिती म्हणून माजी आमदार व एआयसीसी सचिव डाॅ.अंजली निंबाळकर होत्या.व्यासपिठावर चंबन्ना होसमनी, तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी , नगरसेवक तोहिद चांदखन्नावर, लक्ष्मण मादार,अनिता दंडगल, सुर्यकांत कुलकर्णी ,संतोष हंजी,महादेवी कोळी, जाॅकी फर्नाडीस आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी यानी केेले.
कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्वलनाने झाली. यावेळी खानापूर तालुका आम आदमीचे अध्यक्ष भैरू पाटील, पदाधिकारी शिवाजी गुंजीकर, रमेश कौंदलकर ,लबीब शेख,चंद्रकांत मादार, मनोहर पाटील, मल्लीकार्जूण ,करीय्याप्पा आदीनी काॅग्रेस पक्षात प्रवेश केल्याबद्दल माजी आमदार व एआयसीसी सचिव डाॅ.अंजली निंबाळकर यानी काॅग्रेस पक्षाचा शाल घालुन सत्कार केला.
यावेळी बोलताना डाँ.अंजली निंबाळकर तालुक्यात काॅग्रेस पक्षाच्या बळकटी साठी तालुक्यातील आम आदमी पक्षाच्या पदाधिकार्यानी काॅग्रेस पक्षात प्रवेश केला ही आनंदाची गोष्ट आहे.त्याच बरोबर भाजपच्या ही कार्यकर्त्यानी काॅग्रेस मध्ये प्रवेश केला त्यामुळे भविष्यात काॅग्रेसची ताकद वाढणार त्यामुळे काॅग्रेसच्या प्रत्येक पदाधिकार्यानी तसेच कार्यकर्त्यानी संपर्क वाढवून पक्षाची भरभराटी करावी.तालुक्यात पुन्हा एकदा काॅग्रेसची सत्ता आणुन तालुका सुजला सुपला करू असे सांगीतले.
यावेळी बोलताना भैरू पाटील म्हणाले की आम आदमी जी धोरण आहेत तीच धोरण काॅग्रेस मध्ये आहेत. शिक्षण, गरीबासाठी मदत हे केवळ काॅग्रेसच पक्ष करतो आम्ही सर्वजन काॅग्रेस मध्ये प्रेवश केला. असे सांगीतले.
यावेळी नतुन युथ काॅग्रेस अध्यक्ष इसाक पठाण,साईश सुतार आदीचा सत्कार करण्यात आला .
यावेळी उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली.अध्यक्ष महांतेश राऊत यानी मार्गदर्शन केेले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार तालुका अध्यक्ष अँड ईश्वर घाडी मानले.