
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
तोराळी ( ता. खानापूर ) येथील सीआरपीएफ कोब्रा कॅपमधील काॅनस्टेबल प्रदिपकुमार पांडे ( वय ३५) रा.चंडीपूर उत्तर प्रदेश हे आज सोमवारी( दि.१३ ) रोजी सकाळी ६.३० वाजल्यापासुन बेपत्ता झाले आहेत.
गेल्या चार वर्षापासुन ते कोब्रा कॅपमध्ये स्वयंपाकी म्हणून सेवेत होते. आज सकाळी ते अधिकार्याची परवानगी न घेता,कुणालाही न सांगता ते कॅप मधुन निघुन गेले असल्याची फिर्याद उपनिरीक्ष प्रदिपकुमार यानी खानापूर पोलिसात नोंदविली आहे.
सदर व्यक्ती कुणाला आढळल्यास खानापूर पोलिसाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.