
बीयानासाठी शिल्लक असलेल्या उसाला आग!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात आगी लागण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. अशाच प्रकारे कारलगा ( ता.खानापूर ) गावच्या शिवारात बीयानासाठी ठेवलेल्या उसाला गुरूवारी दि.१३ रोजी सायंकाळी अचनाक आग लागली. याचे वयोवृध्द शेतकरी तुकाराम रवळू पवार ( वय.७४) यांचा आग विजविण्याच्या प्रयत्नात असताना आगीत गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की शेतकरी तुकाराम रवळू पवार यानी आपला उस कारखान्याला घातला होता. परंतु एक टनभर उस बीयाणासाठी राखुन ठेवला होता. शेजारी उसाचा रौंधा होता.याचवेळी रौंधाला आग लावत असताना आगीने उसाच्या फडला सायंकाळी आग लागली. डोळ्यादेखत उसाला आग लागली हे पाहुन वृध्द शेतकरी पवार यानी आग विजविण्याचा प्रयत्न केला. मात्र पेटत्या अगीत धुरामुळे गुदमरून ते आगीत पडले .त्यातच त्याचा होरपळून मृत्यू झाला.
शेजारीच त्याचे कुटूंब काम करत होते.आगीचा लोळ पाहुन कुटूंबीयानी आरडा ओरड केली .तोपर्यत पवार यांचा मृत्यू झाला होता.
लागलीच घटनेची माहिती खानापूर पोलिसाना देण्यात आली.पोलिसानी घटनास्थळी धाव घेऊण पंचनामा केला.
घटनेची माहिती मिळताच आमदार विठ्ठलराव हलगेकर यानी घटनास्थळी भेट दिली.
खानापूर सरकारी दवाखान्यात मृत्यू देह पाठवुन शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटूंबाच्या ताब्यात देण्यात आला.
मृत शेतकरी तुकाराम पवार यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,सुन व ना़तवंडे असा परिवार आहे.
त्यांच्या मृत्यूमुळे कारलगा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.