
#सन २०२५ सालचे दिनदर्शिका !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील )
जांबोटी ( ता.खानापूर ) सारख्या दुर्गम भागात सन १९९३ साली दि.जांबोटी मल्टीपर्पज सोसायटीची स्थापना झाली .यंदाच्या ३३ व्या वर्षी सन २०२५ सालच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा शुक्रवारी दि.२० रोजी पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक ,चेअरमन विलासराव बेळगावकर होते. व्यासपीठावर व्हाईस चेअरमन पुंडलीक नाकाडी, संचालक आण्णासाहेब कुडतुरकर, जेष्ठ पत्रकार प्रकाश देशपांडे आदी उपस्थित होते.
प्रांरभी संचालक भैरू पाटील यानी प्रास्ताविक व स्वागत केले.
यावेळी जांबोटी सोसायटीचे संस्थापक चेअरमन विलास बेळगांवकर म्हणाले की, खानापूर तालुक्याच्या दुर्गम भागात मोठ्या कष्टाने कठीण परिस्थितीत सोसायटीची सुरूवात केली. शिवाय तळागाळातील लोकांची साथ मिळाली.त्यामुळे आज सोसायटीची प्रगती झाली.
यंदा येत्या १ जानेवारीला सोसायटी ३३ व्या वर्षात पदार्पण करणार आहे.तर खानापूर शाखेला २५ वर्षे पूर्ण होणार आहेत.त्यामुळे खानापूर शाखेचा रौप्यमहोत्सव साजरा होणार आहे.
ऐवढेच नव्हेतर सोसायटीच्यावतीने गेली अनेक वर्षे धार्मिक कार्यक्रम ,शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले आहे.अशी माहिती सांगीतली.
यावेळी उपाध्यक्ष पुंंडलिक नाडाकी, व पत्रकारानी यावेळी विचार मांडले.कार्यक्रमाचे औचित्य साधुन सोसायटीचे कायदा सल्लागार अँड.केशव कळेकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले .
कार्यक्रमाला माजी जिल्हा पंचायत सदस्य नारायण कार्वेकर, अँड.ईश्वर घाडी सोसायटीचे संचालक आण्णासाहेब कुडतुरकर,पुंडलिक गुरव,विद्यानंद बनोशी,पांडूरंग नाईक,हणमंत काजुनेकर,शाहु गुरव,खाच्चापा काजुनेकर,यशवंत नाईक,भरमानी नाईक,बी एस कुर्लेकर, संचालिका गीता इंगळे,सरस्वती पाटील ,जनरल मॅनेजर ,शाखा मॅनेजर व कर्मचारीवर्ग आदी उपस्थित होते.