
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर शहरातील मराठा मंडळ संस्थेच्या मराठा मंडळ हाय्यर सेंकडरी स्कूलच्या खेळाडुनी नुकताच बेळगाव येथे पार पडलेेल्या जिल्हास्तरीय क्रिडास्पर्धेत १५०० मिटर धावणे स्पर्धेत कु. ज्ञानदेव एम शिंदे याने प्रथम क्रमांक पटकाविला.
तर जिल्हास्तरीय क्रिडास्पर्धेत डिस्कस थ्रो मध्ये लिंगराज एस लमाणी याने व्दितीय क्रमांक पटकाविला.
दोन्ही खेळांडूची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.त्याना क्रिडाशिक्षक श्री निलजकर याचे मार्गदर्शन तर मुख्याध्यापक के व्ही कुलकर्णी व इतर शिक्षकाचे सहकार्य लाभत आहे.
विजयी खेळांडुचे संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागराजु व संचालक शिवाजीराव पाटील,परशराम गुरव आदीनी अभिनंदन केले.