
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
वडेबैेल ( ता.खानापूर ) येथील शेतकर्याचा पावर ट्रेलरने शेतात मशागत करताना अचानक पावर ट्रेलरच्या खाली सापडुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची गुरूवारी घडली.त्या दुर्दैवी शेतकर्याचे नाव अशोक पुंडलिक पाटील ( वय.६१) आहे.
याबाबत घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की,वडेबैलचे शेतकरी अशोक पुंडलिक पाटील हे काल सांयकाळी मिरची लगावड करण्यासाठी आपल्या मालकीचा लहान पावर ट्रेलरने गावच्या तलावाजवळील शिवारात मशागत करत होते.अचानकपणे पावर ट्रेलर रिव्हर्स पडल्याने तोल जाऊन खाली पडला.व पावर ट्रेलरच्या खाली सापडला.त्यात दोन्ही पाय कंबरे पर्यत निकामी होऊन रक्तबंबाळ झाले.
लागलीच त्याच आवस्थेत खानापूर सरकारी दवाखाण्यात पाठविण्यात आले. परंतु वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
त्याच्या पश्चात पत्नी ,दोन मुलगे,एक मुलगी, सुना ,नातवंडे असा परिवार आहे.
नंदगड पोलिस स्थानकात घटनेची नोंद झाली असुन पोलिस पुढील तपीस करत आहेत.