
#बालमंचुनी केली प्रतिकृती!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
दिवाळी सनाचे औचित्य साधुन किल्यांच्चा प्रतिकृती केल्या जातात.त्याच प्रमाणे खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरात बालमंचुनी केलेल्या सिंहगड किल्याच्या प्रतिकृतीचे उदघाटन नुकताच करण्यात आले.
यावेळी निवृत्त जवान अरूण गावडे ,निवृत मुख्याध्यापक ए बी मुरगोड,मारूती देसाई ,पी व्ही पाटील,श्री.शिंदे,आदी मान्यवर उपस्थित होते
मान्यवराच्या हस्ते फित कापून सिंहगड किल्ल्याचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी अरूण गावडे यानी सिंहगडा बदल माहिती दिली.
किल्ला तयार करण्यासाठी समर्थ सुनिल मुतगेकर,हर्षद गोरल,सुरज बेतगावडा,गणराज सुतार,अभिषेक पुजारी,सिद्दार्थ पुजारी आदी बालमंचुनी परिश्रम घेतले.
सिंहगड किल्ला पाहण्यासाठी अबाल पासुन वृध्दापर्यत सर्वानीच गर्दी केली होती.