
सिंगीनकोपचे गणेशमुर्ती वसंत सुतार मुर्तीवर रंगकाम करताना!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील )
गणेशोत्सव काही दिवसावर आला आहे. त्यामुळे गणेशमुर्तीकारासह गणेश भक्तातुन उत्सवाची लगबग मोठ्या उत्साहात सुरू आहे.
गणेशमुर्तीकार गणेशमुर्तीच्या रंंगकामात दंग आहेत. सिंगीनकोप (ता.खानापूर )येथील प्रसिध्द मुर्तीकार वसंत सुतार हे गेल्या अनेक वर्षापासुन गणेश मुर्ती बनवतात.
यंदा ही त्यानी जवळपास २१ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मुर्त्या तयार केल्या आहेत.
यामध्ये खानापूर तालुक्यातील इदलहोंड, गर्लगुंजी,गणेबैल ,काटगाळी,देवलती,आवचारहट्टी,तसेच बेळगाव तालुक्यातील देसुर, मच्छे,धामणे,राजहंसगड,सुळगे(ये), नंदीहळ्ळी आदी गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मुर्तीचा सहभाग आहे.
यावेळी बोलताना मुर्तीकार वसंत सुतार म्हणाले की,अलिकडे रंगाच्या किमती वाढल्या आहेत. कामगार मिळणे कठीण झाले आहे.त्यातच सरकारने पीओपी मुर्त्याना बंदीचा आदेश काढुन मुर्तीकार शेडुच्या मुर्ती करण्याचे फर्माण काढले. अशा अनेक समस्याना तोंड देत मुर्तीकाराना मुर्ती तयार अनेक आडचणीना सामोरे जावे लागते.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मुर्ती या पीओपीच असल्या पाहिजे.तर मुर्तीकाराना मुर्ती करणे सोपे जाईल.
मात्र घरगुती गणेशमुर्ती या शेडुच्याच केल्या जातात.असे सांगुन मुर्तीकार वसंत सुतार यानी जवळपास ४०० घरगुती गणेशमुर्ती तयार केल्या आहेत.सध्या गणेश मुर्तीना रंगगकाम व सजावट करण्याचे काम जोरात सुरू आहे.
या गणेशमुर्ती तयार करताना कुटूंबाचा मोठा हातभार लागतो.
त्यांचा मुलगा स्वागत सुतार हा सुध्दा उत्कृष्ट गणेश मुर्तीकार आहे.तो ही वडीलाना खुप मदत करतो.
सध्या गणेशमुर्त्याची किमत वाढल्या आहेत .असे सांगीतले.