
#वाढ दिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
गर्लगुंजी ( ता.खानापूर ) गावचे रहिवाशी सध्या पुणे येथे वास्तव्यासअसलेले सेवानिवृत्त आँनररी कॅप्टन श्री मधुकर कृष्णाजी पाटील यांंचे ७५व्या वर्षात पदार्पण झाल्यानिमित्त त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन त्याचा थोडक्यात परीचय…
मधुकर कृष्णाजी पाटील हे प्रेमळ व प्रामाणिकपणाने जन माणसात लोकप्रिय असलेले ऑनररी कॅप्टन म्हणून सेवानिवृत्त झाले.
मधुकर कृष्णाजी पाटील यांचा जन्म १२ एप्रिल १९५० साली गर्लगुंजी (ता.खानापूर) येथील शेतकरी कुटूंबात झाला.
लहानपणापासूनच हुशार अभ्यासू वृत्तीमुळे प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपला दबदबा कायम ठेवला. घरची परिस्थिती बेताचीच होती पोटभर खायला मिळणे कठीण अशा परिस्थितीत मराठी शाळेमध्ये सातवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले त्यावेळेला गर्लगुंजी गावात हायस्कूलची सोय नव्हती.त्यातच शिक्षण घेण्यासाठी
खानापूरला जाण्याची सोय नव्हती ,तेव्हा हलशीवाडी ( ता.खानापूर ) येथे आपल्या अत्याच्या घरी राहून महात्मा गांधी हायस्कूल नंदगड येथे दहावीची परीक्षा पास झाले .
विद्यार्थी जीवनात असताना शालेय कार्यक्रमांमध्ये भाग घेत, एक उत्तम नाट्यकलाकार ,उत्तम गायक, उत्कृष्ट क्रीडापटू म्हणून नाव कमावले .गरिबीची परिस्थिती मुळे पुढील शिक्षण घेता आले नाही. काही दिवस मोल मजुरी करून उदर निर्वाह केला .काही महिने हॉटेलमध्ये वेटरची कामे ही केले.
या सर्व प्रसंगातून यशस्वी होत १९७९ यावर्षी भारतीय सेनेत भरती झाले. आणि यशस्वी जीवनाला सुरुवात झाली.
घरी तीन बहिणी दोन भाऊ सर्व खाणारे कमाई काही नव्हती. घराची सर्व जबाबदारी स्वताच्या खांद्यावर घेऊन मिळणाऱ्या पगारावरती कसेबसे दिवस जात होते .आई वडील दोघेही राबराब राबणारे मोल मजुरी करून सुखाचा संसार गाडा चालवत होते. याच वेळी तळेवाडी तालुका चंदगड येथील गरीब शेतकरी घराण्यातील कै रामचंद्र देसाई यांची द्वितीय कन्या ची .सौ .का .रजनी यांच्याशी विवाह झाला .
त्यांच्या संसाररूपी वेलीवर दोन मुली अर्चना व अश्विनी व ची संदीप असे गोडस फुले उमलली संपूर्ण कुटुंब सुखी समाधानी व आनंदात राहत आहे.
त्याचा स्वभाव मनमिळावू प्रत्येकाशी आदराने मायेने वागणारे दुसऱ्याच्या सुखदुःखात सामील होणारे दुसऱ्यासाठी मदतीचा हात सदैव पुढे करणारे एक संगीत प्रेमी, जुन्या हिंदी गाण्यांची आवड जुन्या मित्रांमध्ये खेळीमेळीने हसत खेळत राहणारे एक उमदे व्यक्तिमत्व. आपल्या जीवनात अनेक चढ-उतारा त्यांनी जवळून पाहिले आहेत. त्या प्रत्येक संकटा ना यशस्वीपणे तोंड देत भारतीय सेनेमध्ये प्रामाणिकपणे नोकरी करताना वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्यांच्यावरती मर्जी विश्वास हीच त्यांची खरी संपत्ती ,आपल्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांना त्यांनी व्यवस्थित सांभाळून घेत त्यांना योग्य मार्गदर्शन केले, त्यांच्या या मनमिळावू व आदरपूर्वक मान सन्मानामुळे सर्व पै पाहुण्यांमध्ये त्यांना मोठे आदराचे स्थान आहे. आपल्या कुटुंबामध्ये कोणताही कार्यक्रम असो त्यामध्ये त्यांचा मोठा
सहभाग असायचा. साधी राहणीमान, उत्तम पोशाख, रुबाबदारपणा, भारदस्त व तेजस्वी असे व्यक्तिमत्व सर्वांना आपलेसे करणारे असे हे व्यक्तीमत्व होय.
शनिवार हा बजरंग बली मारुतीचा वार मारुतीचे उपासक व परमभक्त आहेत.
दि.१२ एप्रिल या दिवशी ७५ व्या वर्षात पदार्पण केले. हा सुद्धा दुग्ध साखरेचा योग म्हणावे का ? श्री मारुतीरायाची कृपा त्यांच्यावर अखंड राहावी हीच दयाघन परमेश्वराकडे प्रार्थना त्यांना उदंड आयुष्य व सुख समाधान मिळो हीच त्यांना त्यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा !