
#भाविकानी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली !
#भजनाचा कार्यक्रम संपन्न!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी ( ता. खानापूर ) गावच्या ग्रामदेवता माऊली मंदिराजवळ असलेल्या कलमेश्वर मंदिरात खास शिवरात्री सनानिमित्त बुधवारी दि .२६ रोजी विविध कार्यक्रमानी शिवारात्री उत्सव पार पडला.
बुधवारी पहाटे कलमेश्वर मंदिरात अभिषेक घालुन व विधिवत पुजा करून आरतीचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर भाविकासाठी तिर्थ प्रसादाचे आयोजन करण्यात आले.
बुधवारी सकाळ पासुन गर्लगुंजी परिसरातील भाविकानी मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी केली होती.
दिवसभर कलमेश्वर मंदिरात पुजा आर्चा झाल्यानंतर सायंकाळी संगीत भजनाचा कार्यक्रम पार पडला.यावेळी चव्हाट गल्लीतील भजनी मंडळाने भजन करून जागर केला.रात्री उशीरा पर्यत कलमेश्वर मंदिरात जागर करण्यात आला.
यावेळी गर्लगुंजी परिसरातील भाविकांनी कलमेश्वर मंदिरात मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती.