
#कारलगा यांचा भजनी भारूड कार्यक्रम!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
मौजे घोसे ( ता.खानापूर ) येथील सालाबाद प्रमाणेे यंदा ही रविवारी दि.६ रोजी दुपारी १२.३० वाजता श्री सातेरी माऊली,ब्राम्हणी ,केळबाई ग्रामदेवताचा वार्षिकोत्सव समारंभा निमित्त अभिषेक श्री रवी जोशी भट लोंढा यांच्याहस्ते करण्यात येणार आहे.तर दुपारी १.३० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तर भक्तांच्या मनोरंजनासाठी रात्री १०.३० वाजता चव्हाटा भजनी मंडळ कारलगा यांचा भारूड भजनी कार्यक्रम होणार आहे.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाश मिराशी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी दीपप्रज्वलन पीर मंहत सिंगनाथ महाराज बाळेवाडी मठ, आमदार विठ्ठल हलगेकर ,माजी आम.अरविंद पाटील, भाजप जिल्हा अध्यक्ष प्रमोद कोचेरी,माजी तालुका अध्यक्ष संजय कुबल,बाबूराव देसाई ,आर एफ ओ तेज वाय एफ,सौ. नमिता देसाई ग्रा पं.अध्यक्षा कापोली, हरीष शिलावंत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.