
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
घोटगाळीत ( ता.खानापूर ) येथील श्रीमहालक्ष्मीदेवीचा वर्धापन दिन उद्या रविवारी दि.२० रोजी साजरा करण्यात येणार आहे.
यानिमित्त सकाळी ८ ते १० पर्यत अभिषेक ,ओटी भरणे.दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी ६ वाजता ग्रुप डान्स स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच प्रमुख पाहुण्याचा सत्कार करण्यात आला आहे.
स्पर्धाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डाॅ.रफिक हलशीकर उपस्थित राहणार आहेत. यावेळी श्रीकांत देसाई,पुनिल पाटील,संतोष मिराशी ,अमर कुंभार,आदी उपस्थित राहणार आहेत.
विजयी ओपन सिंगल डान्स स्पर्धकाना बक्षिसे अनुक्रमे १०हजार रूपये,७ हजार रूपये,५हजार रूपये, व २ हजार रूपये,
तर फक्त घोटगाळी गावासाठी ग्रुप डान्स स्पर्धेसाठी बक्षिसे अनुक्रमे ५ हजार रूपये,३ हजार रूपये ,२हजार रूपये,१ हजार रूपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहे
तरी इच्छूक स्पर्धकानी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन करण्यात आले आहे.