
#स्मृतीगंध स्मरणिकांचे होणार प्रकाशन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
गोदगेरी ( ता.खानापूर ) येथील सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळेचा शतकोत्तर तपपुर्ती सोहळा आज सोमवारी दि १७ मार्च रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी जे बेळगांवकर अध्यक्ष,शतकोत्तर तपपुर्ती समिती हे उपस्थित असतील.
यावेळी दीपप्रज्वलन खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी ,पालकमंत्री सतीश जारकिहोळी,महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर,आमदार विठ्ठलराव हलगेकर,माजी आमदार दिगंबर पाटील,माजी आम. अरविंद पाटील, माजी आम.सौ.अंजली निंबाळकर, पिटर डिसोझा संस्थापक,अध्यक्ष ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठान खानापूर यांच्याहस्ते होईल.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती डीडीपीआय लिलावती हिरेमठ, प्रमोद कोचेरी भाजप जिल्हा उपध्यक्ष,रामचंद्र बाळेकुंद्री,कौस्तब देसाई, नासीर बागवाण, किरण गडकरी यांची उपस्थिती राहिल.
यावेळी स्मरणिका प्रकाशन बीईओ पी रामाप्पा, एम डी सदानंद पाटील,विजय पाटील ,रूपेश गुंडकल ,नागेंद्र कुन्नूरकर, यांच्याहस्ते होईल.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून शिवरामप्रसाद त्रिंबक पंडित ( लोंढा ) हे उपस्थित राहतील.
तरी कार्यक्रमाला सर्वानी उपस्थित राहण्याचे आवाहन शतकोत्तर तपपुर्ती सोहळा आयोजन समिती यांच्यावतीने करण्यात आले आहे.