
#पत्रकार परिषदेत माहिती!
#स्मृतीगंध स्मरणिका प्रकाशन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
गोदगेरी ( ता.खानापूर ) येथील सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळेचा शतकोत्तर तपपुर्ती सोहळा सोमवारी दि १७ मार्च रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती शतकोत्तर तपपूर्ती सोहळा समितीच्यावतीने आयोजित मंगळवारी दि ११ रोजी पत्रकार परिषदेत दिली
पत्रकार परिषदेच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बी जे बेळगांवकर अध्यक्ष,शतकोत्तर तपपुर्ती समिती हे उपस्थित होते. यावेळी दिगंबर बेळगावकर,गौतम पाटील,पी.के नंद्याळकर,तुकाराम जांबोटकर,महेद्र देसाई आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अध्यक्ष बी जे बेळगांवकर म्हणाले की ,कै.शिवराम देसाई यानी सन १९१३ साली गोदगेरी गावात शिक्षणाची सोय व्हावी.या उद्दात हेतुने शाळेची सुरूवात केली. आज याशाळेला ११२ वर्षे पूर्ण होत आहेत. याचे स्मरण व्हावे. यासाठी या सोहळ्याचे आयोजन केले आहे.
या सोहळ्याच्या दीपप्रज्वलन कार्यक्रमासाठी खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी ,पालकमंत्री सतीश जारकिहोळी,महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर,आमदार विठ्ठलराव हलगेकर,माजी आमदार दिगंबर पाटील,माजी आम. अरविंद पाटील, माजी आम.सौ.अंजली निंबाळकर, पिटर डिसोझा संस्थापक,अध्यक्ष ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठान खानापूर यांना आमंत्रित केले आहे.
तर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती डीडीपीआय लिलावती हिरेमठ, प्रमोद कोचेरी भाजप जिल्हा उपध्यक्ष,रामचंद्र बाळेकुंद्री,कौस्तब देसाई, नासीर बागवाण, किरण गडकरी हे उपस्थित राहणार आहेत
यावेळी स्मरणिका प्रकाशन बीईओ पी रामाप्पा, एम डी सदानंद पाटील,विजय पाटील ,रूपेश गुंडकल ,नागेंद्र कुन्नूरकर, यांच्याहस्ते होईल.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून शिवरामप्रसाद त्रिंबक पंडित ( लोंढा ) हे उपस्थित राहतील. अशी माहिती दिली.
यावेळी समितीचे सदस्य दिगंबर बेळगावकर म्हणाले की, मराठी शाळेची प्रगती व्हावी. माजी विद्यार्थ्यानी एकात्रित येऊन भविष्यात शाळेची सुधारणा करता येईल मराठी शाळा टिकविता येईल हा आमचा प्रयत्न आहे.
यावेळी गौतम पाटील म्हणाले मी शाळेचा विद्यार्थी आहे.शाळा टिकली पाहिजे विद्यार्थ्यांची संख्या वाढली पाहिजे हा हेतू ठवून आम्ही हा सोहळा आयोजित केला आहे.
यावेळी पी के नंद्याळकर म्हणाले की या शाळेला ११२ वर्षे पूर्ण झालेत.मी सुध्दा या शाळेचा विद्यार्थी आहे. सध्या मराठी शाळा टिकल्या पाहिजेत यासाठी हा प्रयत्न आहे.
निवृत्त क्रीडा शिक्षक तुकाराम जांबोटकर म्हणाले की या शाळेचा मोठा इतिहास आहे.याशाळेच अनेक विद्यार्थ्या उच्च पदावर कार्यरत आहे.या शाळेचा विद्यार्थी उमेश कानडीकर हा कर्नल पदावर कार्यरत आहे. असे कित्येक विद्यार्थी अनेक ठिकाणी कार्यरत आहेत.यासर्वाना आमंत्रित करून जुन्या आठवणीना उजाळ देणारा हा सोहळा आहे. असे मत व्यक्त केले.
तरी कार्यक्रमाला सर्वानी उपस्थित राहण्याचे आवाहन शतकोत्तर तपपुर्ती सोहळा आयोजन समिती यांच्यावतीने करण्यात आले आहे.