
#तालुक्यातुन ५९ शेतकरी महिलाना होणार लाभ!
#पात्र महिलाना २० कोंबडयांचे होणार वाटप!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील)
कर्नाटक सहकार कुक्कटमहामंडळ बेंगलोर,यांच्या वतीने प्रत्यारोपित कोंबडयाचे पालन करण्यासाठी सन २०२४-२५ सालातील खानापूर तालुक्यातील ग्रामीण शेतकरी पात्र महिलाना पाच आठवड्याची २० प्रत्यारोपित कोंबड्याचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.
यासाठी तालुक्यातील ५९ शेतकरी लाभार्थी महिलाना याचा लाभ होणार आहे.
यामध्ये अनुसुचित जातीतील महिला लाभार्थीना ३ ,अनुसुचित जमाती महिलासाठी ४७,अल्पसंख्याक महिला १,सामान्य महिला ८ असे एकूण ५९ पात्र महिलाना याचा लाभ होणार आहे.अशी माहिती खानापूर पशु खात्याचे वैद्यकी अधिकारी डाॅ. ए .एस .कोडगी यानी दिली आहे.
इच्छूक लाभार्थीनी आवश्यक कागदपत्रासह अर्ज करणे गरजेचे आहे.
यासाठी छायाचित्र जोडलेले पूर्ण अर्ज, ओळख पत्राची छायाप्रत,आधार कार्ड झेराॅक्स,बीपीएल कार्ड झेराॅक्स, सह येत्या १० जानेवारी पर्यत अर्जासह जवळच्या पशु कार्यालयाशी संपर्क करावा.