
गुंफण साहित्य अकादमी व शिव स्वराज जन कल्याण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने.
#लोकमान्य भवन खानापूर!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर (सुहास पाटील)
खानापूर येथील लोकमान्य भवनात उद्या रविवारी दि.२२ ) रोजी गुंफण साहित्य परिषद व शिवस्वराज्य संघटना खानापूर यांच्या सयुंक्त विद्यामाने २० वे गुंफण साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
रविवारी सकाळी ८ वाजता ग्रंथदिडीला सुरूवात होऊन ज्ञानेश्वर मंदिरापासुन कै.श्रीमंत उदयसिंह सरदेसाई साहित्य नगरी पर्यत ग्रंथ दिंडी येईल.
#ग्रंथ दिंडीचे उदघाटन!
आमदार विठ्ठलराव हलगेकर,माजी आमदार मनोहर किणेकर,माजी आम. दिगंबर पाटील,माजी आम.अरविंद पाटील,माजी आम.डाॅ.अंजली निंबाळकर,आर.एम.चौगुले,रमाकांत कोंडुसकर अध्यक्ष श्रीराम सेना,आदीच्याहस्ते होणार आहे.
#संमेलनाचे उदघाटन व गुंफण पुरस्कार वितरण!
यावेळी समेलनाचे उदघाटन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याहस्ते तर संमेलनाध्यक्ष रंगनाथ पठारे असुन स्वागताध्यक्ष निरंजन सरदेसाई अध्यक्ष शिवस्वराज फाऊंडेशन हे राहणार आहेत.
कै.श्रीमंत उदयसिंह सरदेसाई साहित्य नगरी उदघाटन मालोजी अष्टेकर सरचिटणीस मध्यवर्ती म ए समिती बेळगाव. व विलासराव बेळगांवकर माजी अध्यक्ष म ए समिती खानापूर यांच्याहस्ते.
तर मनोहर माळगावकर व्यासपीठाचे उदघादन केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक याच्याहस्ते होणार आहे.
तर द.गो. सडेकर ग्रंथ दालनाचे उदघाटन शरद केशकामत ,प्रकाश देशपांडे यांच्याहस्ते होणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामिण साहित्यिक बबन पोतदार ,चित्रा क्षिरसागर सामाजिक कार्यकर्त्या ,साहित्यिक गोवा या उपस्थित राहणार आहेत.
यावेळी विविध फोटोचे पुजन मान्यवरांच्याहस्ते होणार आहे.
दुपारी २ वाजता तबला जुगलबंदी तबला वादक मष्णू चोर्लेकर संगीत विशारद ,सतीश गच्ची
#दुसर्या सत्रात कवी संमेलन !
सहभाग कवी: प्रा .चंद्रकात पोतदार,चित्रा क्षिरसागर,चद्रशेखर गवस,स्वाती बाजारे,लहु दरेकर,कविता फडके,रामचंद्र कांबळे,कृष्णा पारवाडकर,महादेव खोत,सु.ना. गावडे,अमृत पाटील ,गुरूनाथ किरमिटेआदी.
#तिसरे सत्र: परिसंवाद !
विषय : आजच्या पत्रकारीते पुढील आव्हाने
अध्यक्ष : पत्रकार विलास अध्यापक,
सहभाग : अनिल आजगावकर,वासुदेव चौगुले,राजु मुळ्ये,आदी,
#चौथे सत्र: शिव व्याख्यान
विषय : छ.शिवाजी महाराज समजुन घेताना
व्याख्याते : विनोद बाबर सातारा.
यावेळी सत्कार समारंभ व समारोप कार्यक्रम होईल.
कार्यक्रमाला विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तरी समस्त खानापुर तालुक्यातील जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवराज जनकल्यान फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.