
#रोक रक्कम सह सोन्याची चोरी!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात दिवसेदिवस चोरीचे प्रमाण वाढले असुन गुरूवारी दि.३ रोजी रात्री खानापूर तालुक्यातील माडीगुंजी,करंबळ,देवलती आदी गावात चोरीच्या घटना घडल्या असुन नागरीकांतुन भितीचे वातावरण पसरले आहे.
माडीगुंजी (ता.खानापूर ) गावात रात्री आठ घरांचे कुलूप तोडून दागीणे व रोख रक्कम लंपास केली आहे.यामध्ये उमेश तमूचे हे कुटूंबासह परगावी गेले होते.याचा फायदा घेत चोरट्यानी घरचा कुलूप तोडुन घरातील तिजोरीतुन दहा हजार रूपये व चार लाख रूपयाचे सोन्या,चांदीचे दागीणे लंपास केले.
तर राजाराम कल्लाप्पा गुरव हे शेतकरी वीट व्यवसायासाठी शेतात मुक्कामाला आहेत.याचाच फायदा घेत घरात शिरून तिजोरी फोडण्याचा प्रयत्न करत असताना त्याचवेळी बाळकृष्ण घाडी हे़ शेतातुन घराकडे येत होते.त्याच्या गाडीचा आवाज ऐकताच चोरट्यानी तेथून पालायन केले.
त्याचवेळी बाळकृष्ण घाडी यानी लागलीच रावजी बीर्जे,जयकुमार गुरव ,संदीप घाडी,याना संपर्क करून माहिती दिली.तोपर्यत चोरटे पसार झाले होते. परंतु त्यांच्या जागरूकतेने राजाराम गुरव याच्या घरातील होणार्या चोरीचा प्रयत्न असफल झाला.
तसेच चोरट्यानी विनायक घाडी,महादेव करंबळकर,तुकाराम घाडी,श्री मुल्ला ही कुटूंबे कामानिमित्त बाहेर गावी गेली असल्याने त्याच्या घराचे कुलूप तोडुन चोरीचा प्रयत्न केला. परंतु चोरांच्या हाती काही लागले नाही तर निलेश केशकामत व रमेश देसाई ही कुटूंबे ही कामानिमित्त बाहेरगावी गेल्याने त्याच्या घराचा कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला.मात्रृ चोराच्या हाती काहीच लागले नाही. तिजोरी व कपाटाचे मोडतोड करून नुकसान केले आहे.
शुक्रवारी सकाळी गावातील चोरीची घटना समजताच युवा कार्यकर्ते पंकज कुट्रे यानी खानापूर पोलिसाना माहिती दिली.
लागलीच घटनास्थळी पोलिसानी धाव घेऊन पंचनामा केला.यावेळी क्राईम पीएस आय चनबसव बबली व शशी खामकेरी पुढील तपास सुरू केला.
याचबरोबर करंबळ तसेच देवलती आदी गावातुन चोरीच्या घटना घडल्या आहेत.