
#ग्रामस्थांच्या बैठकीत चर्चा!
सोमवारी सायंकाळी ६ वाजता बैठकीचे आयोजन !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
हलगा ( ता.खानापूर) येथे शनिवार दि.२२ रोजी श्री महालक्ष्मी मंदिर येथे समस्त हलगा ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली.
यावेळी हलगा ग्रामपंचायत सदस्य रणजीत कलाप्पा पाटील यांनी मंदिर श्री महालक्ष्मी मंदिर जिर्णोद्वार व्हावा असा विषय व्यक्त केला .त्याला हलगा ग्रामस्थांनी एकमुखी पाठिंबा देऊन आजच्या झालेल्या मीटिंगमध्ये सर्वानुमते श्री महालक्ष्मी मंदिर जीर्णोद्वार करून लवकरात लवकर मंदिर बांधकामाला सुरुवात व्हावी असा संकल्प करण्यात आला. बैठकीला हलगा गावातील वतनदार मंडळी व गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. यामध्ये हलगा ग्रामपंचायतीचे नूतन चेअरमन सुनील मारुती पाटील, कल्लाप्पा फटाण नागेशी फटाण माजी ग्रामपंचायत सदस्य, तुकाराम फटाण पि.के.पि. स. सदस्य,एम.जी.पाटील निवृत्त शिक्षक, अमृत फटाण माजी ग्रामपंचायत सदस्य,हणमंत पाटील, वसंत सुतार, प्रमोद सुतार, पुंडलिक पाटील,गंगाराम फटाण, लक्ष्मण बिस्टेकर, ओमाना केसरेकर,गोपाळ ईश्राण, धाक्लोजी बिस्टेकर, विजय ईश्राण, सुरेश रुपण, बाबू गुरव ज्ञानेश्वर सनदी व उपस्थित गावकऱ्यांच्या सर्वानुमते महालक्ष्मी मंदिर जीर्णोद्धार करण्याचा संकल्प करण्यात आला.
यावेळी बैठकीत सोमवार दि.२४ रोजी श्री महालक्ष्मी मंदिर जीर्णोद्धार कमिटीची निर्मिती करून मंदिराच्या कार्य सुरू करण्यात येईल त्यासाठी हलगा गावातील जे १कामानिमित्त बाहेरगावी आहेत त्यांनी सोमवारी सायंकाळी ठीक सहा वाजता मंदिरामध्ये उपस्थित राहून जीर्णोद्वार करण्याच्या संकल्प मध्ये आपले विचार व्यक्त करण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थितीत राहावे असा असा ठराव सर्वानुमते पास करण्यात आला.
त्यासाठी सर्व ग्रामस्थांनी वेळेत उपस्थित राहून नवीन संकल्पना चालना द्यावी. असे ठरविण्यात आले.