
संदेश क्रांती न्यूज
खानापूर प्रतिनिधी
हलगा ( ता.खानापूर ) येथील श्री कलमेश्वर मल्टीपर्पज को आप सोसायटी लिमिटेड हलगा यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर खानापूर तालुक्यातील श्री कलमेश्वर मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी लिमिटेड हलगा व कर्नाटक अल्बरर्नेटिव्ह हेल्थकेअर थेरपी सेवा समिती आर हुबळी यांच्या संयुक्त विद्यमानाने हलगा तालुका खानापूर येथे श्री टी एल सुतार सर यांच्या घरी ८९ वे मोफत आरोग्य शिबिर आज मंगळवारी दि २५ मार्च ते १० एप्रिल पर्यत होणार आहे . तरी याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा ही विनंती या उपचार शिबिरामध्ये ॲक्युप्रेशर रिप्लेक्सोलॉजी फूड थेरपी मसाज थेरपी मर्मा थेरपी ब्लड सर्क्युलेशन थेरपी व्हायब्रेटिंग थेरपी मॅग्नेटिक थेरपी ट्रॅविस्टर र्थेरपी रोलर थेरपी सुजोक थेरपी इलास्टीक रिंग आणि ज्यूस थेरपी या उपचार पद्धतीने उपचार करण्यात येतील सर्व जुनाट आजारासाठी जोखीम मुक्त नैसर्गिक उपचार या उपचार पद्धतीला जगातील आरोग्य संघटनेने १९८७ मध्ये मान्यता दिली आहे या उपचार पद्धतीने शरीरावर कोणताही दुष्परिणाम होणार नाही आरोग्याच्या विकासासाठी संशोधनासाठी हे उपचार पद्धती अत्यावश्यक असल्यामुळे शास्त्रज्ञांनी त्यावर संशोधन करून ही उपचार पद्धती शोधून काढले आहे या उपचाराच्या पद्धतीचे स्वतःचे विशिष्ट पद्धत आणि प्रक्रिया आहे या उपचार पद्धतीचे प्रसिद्ध तज्ञ बसवराज बी म्यागडी यांच्या मार्गदर्शनाखाली लोकांनी ही पद्धत पाळली तर निश्चितच चांगले परिणाम मिळतील या उपचार पद्धतीमध्ये मधुमेह बीपी लठ्ठपणा वजन निद्रानाश गॅस ट्रबल वैरिकास ट्रबल अर्धांग वायू संधिवात गुडघेदुखी टाच दुखी लघवीचे आजार पोटदुखी पाय दुखी मानदुखी मज्जा तंतू वेदना खोकला आवाजाची समस्या थायरॉईडची समस्या धुळीच्या अलार्जी डोळे पानावर डोळे लाल होणे श्रवण कमी होणे कान गळणे नाकातून पाणी येणे घशाचा त्रास स्मरणशक्ती कमी होणे पुरळ केस गळणे मुळव्याध महिलांच्या विविध समस्या अशा अनेक आजारावर उपचार केले जातील शंभर टक्के वजन कमी आणि लठ्ठपणा कमी होईल हा उपचार अतिशय प्रभावी असून त्याचे चांगले परिणाम दिसून येतील कर्नाटकात शहर खेडे आणि परिसरात एकूण आतापर्यंत ८८ शिबिरे झाले असून त्याला त्यात मोठे यश आले असून आता हलगा तालुका खानापूर येथे ते ८९ व्या शिबिरात पदार्पण करत आहेत हलगा गावातील ग्रामस्थ वारकरी मंडळ महिला मंडळ व सर्व सामाजिक व युवक संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने मोफत आरोग्य शिबिर घेण्यात येत आहे.