
#मणतुर्ग्यात श्रीदेव रवळनाथ मंदिराच्या जिर्णोध्दारनिमित्त कार्यक्रम!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर ( सुहास पाटील)
हिंदू धर्मात मकर संक्रातीच्या सना नंतर हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करतात. हळदी कुंकू समारंभ म्हणजे सुवासिनीचा आनंदाचा सन यातुन नारीशक्तीचा मानसन्मान होतो.असे विचार निवृत्त मुख्याध्यापिका सौ.अरूंध्दती दळवी यानी
मंणतुर्गा येथील श्री देव रवळनाथ मंदिराच्या जीर्णद्धाराच्या निमित्ताने आयोजित गावच्या महिलांच्या हळदी कुंकू समारंभात बोलताना व्यक्त केले.
कार्यकर्माच्या अध्यक्षस्थानी सौ. सुप्रिया मारुती पाटील होत्या, स्वागतअध्यक्ष सौ. अश्विनी राजाराम गुंडपिकर होत्या, द्वीप प्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले, हळदी कुंकू कार्यक्रम समारंभाचे उद्घाटन निवृत्त मुख्याधीपिका सौ. अरुंधती आबासाहेब दळवी यांच्या हस्ते झाले, गणेश पूजन सौ. साधना बाळाराम शेलार यांच्या हस्ते झाले, श्री देव रवळनाथ पूजन सौ. समृध्दी गजानन गुरव यांच्या हस्ते झाले, विविध देवतांचे पूजन खालील मान्यवरांच्या हस्ते झाले, या कार्यक्रमाला प्रमुख वक्त्या म्हणुन अँड.सौ. अंकिता गौतम सरदेसाई उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे औचित्य साधुन
कु.चित्रा बाबाजी गुंडपीकर हिने गुजरात येथे झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला त्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला.
उपस्थितांचे स्वागत आबासाहेब दळवी यांनी केले, तर प्रास्ताविक बाळासाहेब शेलार यांनी केले, सूत्रसंचालन मुख्याध्यापक मारुती देवकरी यांनी केले, शेवटी आभार प्रदर्शन शांताराम पाटील यांनी केले,
यावेळी महिलानी श्रीदेव रवळनाथ मंदिराच्या बांधकामासाठी सढळ हाताने देणगी देऊ केल्या.