
#घरीच साधेपणाने वाढदिवस!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर तालुका शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष व निवृत्त मुख्याध्यापक तसेच मयेकरनगरातील रहिवाशी ए बी मुरगोड यांचा ६६ वा वाढदिवस गुरूवारी दि.१२ डिसेंबर रोजी त्याच्या मयेकरनगरातील निवासस्थानी साधेपणाने साजरा करण्यात आला.
प्रारंभी त्यांच्या सौभाग्यवती हरसनवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.जे ए मुरगोड यानी औक्षण करून त्याना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी खानापूर तालुक्यातील शिक्षक महादेव बांदिवडेकर, निवृत्त मुख्याध्यापक दशरथ कुंभार , एल व्ही गुरव,हणमंत करंबळकर, के एच कौंदलकर,रामा अल्लोळकर,रवी सुतार, सह इतर शिक्षक मोठ्या संख्याने उपस्थित होते.
यावेळी शिक्षकानी ए बी मुरगोड याना पुष्पहार घालुन त्याना शतायुषी भव अशी शुभेच्छा देऊ केल्या.