
काॅग्रस नेेते अँड.ईश्वर घाडी.
हत्तरवाडात डाॅ.बाबासाहेब आंबेडकराना अभिवादन अँड.ईश्वर घाडी,सौ.सावित्री मादार, वैष्णवी पाटील,बाळकृष्ण कोलकार आदीनी केले.
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील )
शिका ,संघटीत व्हा .आणि संघर्ष करा. असा संदेश भारतीय संविधानाचे जनक महामानव भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यानी भारतासह संपूर्ण जगाला ही आपल्या विचारातुन दिला.या त्यांच्या संदेशाचा विचाराचा, कार्याचा वारसा जपत देशाला समृध्द करूया. असे विचार खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी यानी हत्तरगा (ता.खानापूर ) येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर विचार युवक मंचच्यावतीने आयोजित डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची १३४ व्या जयंती कार्यक्रमात बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले
की,डाॅ.बाबासाहेबाच्या विचारांची व मूल्यांची प्रकर्षाणे आठवण होते.बेकारी,गरीबी याविरूध्दचा लढा देखील डाॅ.बाबासाहेबांच्या चळवळीचे मुख्य सुत्र होते.माजी पंतप्रधान कै.इंदिरा गांधी यानी देशातल्या बॅकांचे राष्ट्रीयकरण केले.व सावकारी रद्द केली.
डाॅ.बाबासाहेब केवळ सामाजिक सुधारक नव्हते.तर त्यानी आर्थिक विषमतेवरही भाष्य केले.आर्थिक समानता हीच खर्या सामाजिक बदलाची खरी गुरूकिल्ली आहे.
असे विचार वक्त करून माजी आमदार व एआयसीसीच्या सचीव डाॅ. अंजली निबाळकराच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काॅग्रेस नेते तालुक्याच्या विकासासाठी रात्रंनदिवस झटत आहोत.असे मत व्यक्त केले.
यावेळी सौ.सावित्रि मादार यानी तालुक्यात काॅग्रेस पक्षाकडून विकास कामासाठी नेहमीच प्रयत्न होताना दिसत आहेत.
डाॅ.बाबासाहेबाची जयंती ही केवळ एका समाजाने साजरी करण्यापेक्षा सर्वानी मिळून मोठ्या उत्साहाने साजरी केली पाहिजे जसे पारायण सोहळे साजरे केले जातात.यापुढे सर्वानी मिळून डाॅ.बाबासाहेब आबेडकर जयंती साजरी करणे महत्वाचे ठरेल असे मत व्यक्त केले.
प्रारंभी काँग्रेस तालुका अध्यक्षअँड. ईश्वर घाडी व उपस्थितांच्याहस्ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची पुजा करून अभिवादन केले.
यावेळी उपस्थित पाहुण्याचा शाल,मानचिन्ह व पुष्पहार घालुन सत्कार केला.
यावेळी व्यासपिठावर निवृत्त जवान बाळकृष्ण कोलकार वैष्णवी पाटील, बसापा गावडा,अर्जून गावडाआदी उपस्थित होते.
यावेळी कार्यकर्ते ,सातेरी मादार ,अशोक मादार,तानाजी मादार,शिवाजी मादार,सिध्दापा मादार,नामदेव मादार व नागरीक उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक व आभार फकिरापा मादार यानी केले.