
#वनखात्याचे साफ दुर्लक्ष,
शेतकर्यांच्या केळी,नारळ ,सुपारी पिकांचे नुकसान!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात वर्षभर हत्तीकडुन पिकांचे नुकसान होत आहे.मात्र याकडे वनखात्याचे साफ दुर्लक्ष होत आहे.
नुकताच माडीगुंजी ( ता.खानापूर ) येथील शेतकरी कृष्णा केशव बांदोडकर,शिवाजी बांदोडकर ,जी.ई.गंगाधर यांच्या शेतातील नारळ,केळी,सुपारी पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे.
गुंजी परिसरात हत्तीनी गेल्या कित्येक दिवसा पासुन हौदास मांडला.त्यामुळे शेतकरी वर्गातुन कमालाची नाराजी पसरली आहे.
लोकप्रतिनिधी हत्तीचा बंदोबस्त करण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करावे.अशी मागणी माडी गुंजी परिसरातील शेतकरी वर्गातुन होत आहे.