
#नारळ,केळी सुपारीच्या झाडांचे प्रचंड नुकसान!
#ग्रा पं सदस्या अंजना देसाई यानी वनखात्याकडुन नुकसान भरपाईची मागणी केली!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
घोसे ( ता.खानापूर ) परिसरात हत्तीच्या कळपाने नारळ ,केळी व सुपारी बागेत पिकांचे प्रचंड नुकसान केले. गेल्या तीन दिवसापूर्वी घोसे गावच्या संतोष मिराशी यांच्य सर्वे नंबर ४९ शिवारातील सुपारी बागेतील सुपारीची झाडे,केळी ,तसेच नारळांच्या झांडांचे नुकसान केले आहे.
त्यामुळे शेतकर्यांचे लाखोचे नुकसान झाले आहे.
याबाबत ग्राम पंचायत सदस्या अंजना देसाई यानी नुकसानग्रस्त शेतकर्याला वनखात्याकडुन त्वरीत आर्थिक नुकसान मिळवुन देण्याची मागणी केली आहे.
संबधीत शेतकर्याने सुपारी झाडाची लागवड केली आहे.यातील शेकडो झाडे हत्तीच्या कळपाने मोडुन जमिनदोस्त केली आहे.
त्याचबरोबर केळी व नारळाची दोनशे झाडे मोडुन जमिनदोस्त केली आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे एका रात्रीत नुकसान झाल्याने शेतकर्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
लोंढा वनधिकारी वाय पी तेज यानी घोसे गावच्या शेतकर्याच्या नुकसानीची पाहणी करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवुन देण्याची मागणी ग्राम पंचायत सदस्या अंजनी देसाई यानी केली आहे.