
#दुचाकीला कारने ठोकरले !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
बेळगाव पणजी महामार्गावरील होनकल क्रासवर दुचाकीला कारने ठोकरल्याने एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी दि.२० रोजी दुपारी घडली.
आपघातात तिंबोली रामनगर येथील शंकर पाऊसकर(वय. ३६) हा गंभीर जखमी झाला असुन त्याला उपचारासाठी लागलीच बेळगाव येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले .
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी बेळगाव पणजी महामार्गावरील होनकल क्राॅसवर दुभाजकाना ओलांडुन दुसर्या बाजुला आलेल्या दुचाकीला कारची (जीजे १८ बीडी १४५६) जोराची धडक बसली.
त्यामुळे दुचाकी स्वार शंकर पाऊसकर हा कारच्या समोर बाजुला आढळला. त्यात शंकरच्या डोकीला गंभीर जखमी होऊन अतिरक्तस्त्राव झाला. लागलीच त्यांना खानापूर सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र पुढील उपचारासाठी बेळगाव येथे पाठविण्यात आले.