
#आम.विठ्ठल हलगेकर ,अँड.ईश्वर घाडी,अरविंद पाटील,संजय कुबल,राजू सिध्दाणी आदीची उपस्थिती!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
होनकल ( ता.खानापूर ) येथील श्रीराम हनुमान मंदिराचा कळसारोहण,चौकट पुजन कार्यक्रम बुधवारी दि २ रोजी पार पडला.
कार्यक्रमाची सुरूवात अवरोळी मठाचे स्वामी चन्नबसवदेवरू रूद्रस्वामी यांच्याहस्ते कळसारोहणाने झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोनेश्री रामू जुंजवाडकर होते.
यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर,माजी आमदार अरविंद पाटील, तालिुका काॅग्रेस अध्यक्ष अँड. ईश्वर घाडी,भाजपा माजी तालुका अध्यक्ष संजय कुबल,निवृत्त उपतहसीलदार दशरथ घाडी,म ए समिती तालुका अध्यक्ष गोपाळ देसाई, राजू सिध्दाणी,तिरूपती कांबळे,श्रीकांत पाटील , प्रा.पुडलिक कर्लेकर,ग्राम पं.अध्यक्षा सौ.प्रितक्षा कर्लेकर,सदस्या शांता कौंदलकर,शोभा मादार,नारायण शास्त्री, व गावकरी आदीच्याहस्ते चौकट पुजन, दीपप्रज्वलन
व विविध फोटोचे पुजन करण्यात आले.
यावेळी प्रास्ताविक उपस्थितांचे स्वागत मुख्याध्या के एच.कौंदलकर यानी केले.
मान्यवरांचा सत्कार!
कार्यक्रमाचे औचित्य साधुन निवृत्त कर्मचारी धानाप्पा जुंजवाडकर,तुकाराम करंजळकर,मारूती घाडी,आप्पाजी झेंडे, रामचंद्र घाडी,रमेश कौंदलकर, विश्वनाथ घाडी, यशवंत देसाई हलशीवाडी, मेस्त्री सुर्यंकांत वाणी आदीचा पाहुण्याच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना काॅग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी म्हणाले की काॅग्रेसच्या पंचहमी योजनेचा गोरगरीब कुटूंब चांगला फायदा होत आहे.महिलाना मोफत बस प्रवास, कुटूंबाना १५ किलो तांदुळ रेशन मार्फत दिले जात आहे.त्यामुळे कुटूंबाना मोठी मदत झाली आहे.असे सांगुन गावात उभारण्यात आलेल्या मंदारात कार्यालयाची सोय झाली तर गावची लग्न कार्ये सुरळीत पार पडतील व बाहेर मंगलकार्याना अमाफ पैसा देऊण लग्न करण्याचा खर्च वाचेल. तेव्हा मंदिराचे कार्य वेळेत पूर्ण करा. असे सांगुन पाच हजार रूपायाची देणगी जाहिर केली.
यावेळी उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्याध्यापक के.एच.कौंदलकर यानी केले.तर आभार शिक्षक जोतिबा घाडी यानी मानले.