
#नागरगाळी वनविभागाच्या अधिकार्यांची कारवाई!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
हलशीवाडी (ता. खानापूर ) परिसरात जंगली डुक्कराची शिकार कल्याप्रकरणी नागरगाळी वनविभागाच्या अधिकार्यानी हलशीवाडी येथील अर्जून देवाप्पा देसाई ( वय ५९) याना गुरूवारी दि.१६ रोजी अटक करण्यात आली.
याबाबत नागरगाळी वनविभागाच्या अधिकार्याकडुन मिळालेली माहिती अशी की,वनविभागाच्या अधिकार्यानी गुरूवारी सकाळी साडे आठच्या दरम्याने संशयीत आरोपी अर्जून देसाई यांच्या राहत्या घरावर टाकुन त्याच्या जवळ असलेले डुक्कराचे दोन किल्लो मांस आढळले. त्याची चौकशी केली असता त्यानी डुक्कराची शिकार केल्याचे मान्य केले .त्यामुळे त्याच्यावर वनजीवन कायदा १९७२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.व त्याना ताब्यात घेण्यात आले .
ही कारवाई नागरगाळी विभागाचे उपवनसरंक्षक शिवानंद मगदुम यांच्या मार्गदर्शना खाली वनक्षेत्रपाल प्रशात मगसुळी,मेरडा वनपरिक्षेत्राचे सहाय्यक वनक्षेत्र एस जी हिरेमठ व हलगा वनपाल विजयकुमार कौजलगी यानी केली.