
#खानापूर म ए समितीचे आवाहन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
सीमा प्रश्नाच्या लढ्यात अनेक हुतात्म्यानी आपले बलिदान दिले आहे. त्यामुळे १७ जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून सीमाभागात पाळला जातो. या दिनी खानापूर येथील स्वर्गीय नागाप्पा होसुरकर स्मारकाजवळ अभिवादन केले जाते.
यावर्षीही स्वर्गीय नागाप्पा होसुरकर यांच्या स्मारकाजवळ तालुक्यातील सीमावासीयानी उपस्थित राहावे. व दि. १७ जानेवारी हा दिवस कडकडीत हारताळ पाळुन हुतात्म्याना अभिवादन करावे. असे आवाहन खानापूर तालुका म ए समितीच्यावतीने सोमवारी दि.१३ रोजी पत्रके वाटप करून करण्यात आले.
यावेळी खानापूर तालुका म.ए.समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, माजी आमदार दिगंबर पाटील,कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील,सरचिटणीस आबासाहेब दळवी, माजी सभापती मारूती परमेकर,प्रकाश चव्हाण ,विठ्ठल गुरव, राजाराम देसाई,जयराम देसाई,लक्ष्मण कसर्लेकर, पुंडलिक पाटील, कृष्णा मनोळकर,आदी समितीचे बहुसंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१७ रोजी कोल्हापूर धरणे आंदोलनात सहभाग!
दि.१७ जानेवारी हुतात्मा दिनाचे औचित्य साधुन सकाळी ९ वाजता खानापूर स्टेशन रोड येथील हुतात्मा कै.नागाप्पा होसुरकर स्मारकाला अभिवादन केल्यानंतर सकाळी ११ वाजता वर्दे पंप येथे सर्व कार्यकर्त्यानी उपस्थित राहावे.असे आवाहन करण्यात आले आहे.
दुपारी २ वाजता कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन व हुतात्म्यांना अभिवादन केले जाणार आहे.तरी खानापूर तालुक्यातील कार्यकर्त्यानी बहुसंख्येने उपस्थित राहावे.असे आवाहन करण्यात आले आहे.