
#मातीच्या ढिगार्यावर खेळताना विधुत तारेला स्पर्श!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
इदलहोंड (ता. खानापूर ) येथील मनाली मारूती चोपडे ( वय. ९) इयत्ता ३ री शिकणारी विद्यार्थीनी बुधवारी दि. २ एप्रिल रोजी घरापासुन जवळच वीटा तयार करण्यासाठी साठवलेल्या मातीच्या ढिगार्यावर सायंकाळी ५.३० च्या सुमारास खेळण्यासाठी गेली होती. खेळताना तिचा तोल गेल्याने पडण्याच्या भितीने ढिगार्यावरून गेलेल्या विधुत तारेला पकडल्याने तीचा जागीच मृत्यू झाला.तर जवळ असलेला एक लहान मुलगा जखमी झाला.त्याला लागलीच खानापूर सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले .
लागलीच खानापूर पोलिसाना घटनेची माहिती मिळताच घटना स्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
मुलीचा मृत्यदेहाची खानापूर सरकारी दवाखान्यात उत्तरीय तपासणी करून मृत्यूदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
सदर विटासाठी साठवलेला मातीचा ढीग विधुत तारामुळे धोक्याचा आहे. तो हटविण्याबदल वीट मालकाना सांगण्यात आले होते.मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने निष्षाप मुलीला जीव गमवावा लागला.
सदर मुलीच्या पश्चात आई ,वडील ,आजी आजोबा,भाऊ ,बहिण असा परिवार आहे.