
#निवडणुक अधिकारी भरतेश शेबण्णावर!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
इदलहोंड ( ता.खानापूर ) येथील नुकताच झालेल्या कृषी पत्तीन संघाच्या चुरशीच्या पंचवार्षिक निवडणुकीत दोन गटात झालेल्या निवडणुकीत माजी आमदार व डीसीसी बॅक संचालक अरविंद पाटील यांच्या नेतृवाखाली बाचोळकर पॅनलने वर्चस्व मिळविले.
त्यानंतर मंगळवारी दि.१८ रोजी चेअरमन व व्हाईस चेअरमनची पदाची निवड पार पडली.
यावेळी चेअरमन पदी चांगाप्पा कृ.बाचोळकर याची निवड करण्यात आली. तर व्हाईस चेअरमन पदी सुभाष कुंभार याची बीन विरोध निवड करण्यात आली.
यावेळी निवडणुक अधिकारी म्हणून भरतेश शेबळण्णावर यानी काम पाहिले.
यावेळी संचालक किरण पाटील ,संजय जाधव,बाळाराम निलजकर,डाॅ.बसवंत इदलहोंडकर, विष्णू पाखरे,चन्नाप्पा बाळण्णावर, नामदेव पाखरे, संचालिका सुनिता पाटील ,रूक्मिणी गुरव,आदी संचालक उपस्थित होते.
यावेळी गोविंद जाधव ,सदानंद होसुरकर,उदय पाटील,नारायण पाखरे,मनोहर बरूकर,सत्यापा पाटील आदी उपस्थित होते.
चेअरमन पदी माजी ग्राम पंचायत अध्यक्ष ,विद्यामान सदस्य चांगाप्पा बाचोळकर तर व्हाईस चेअरमन पदी सुभाष कुंभार यांची निवड जाहिर होताच. फटाक्याची अतिषबाजी व गुलाल उधळुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ग्राम दैवत पिसेदेव व गणेश मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आशिर्वाद घेतला.
यावेळी संचालक मंडळातुन आनंदाचे वातावरण पसरले होते.