
#१२ पैकी ९ संचालकाचा बचोळकर पॅनलमधुन विजय!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
इदलहोंड ( ता.खानापूर ) येथील नुकताच झालेल्या कृषी पत्तीन संघाच्या चुरशीच्या पंचवार्षिक निवडणुकीत दोन गटात झालेल्या निवडणुकीत माजी आमदार व डीसीसी बॅक नेतृवाखाली बाचोळकर पॅनलने वर्चस्व मिळविले.
विजयी उमेदवार!
या सोसायटीवर सामान्य कर्जदार गटातुन झालेल्या निवडणुकीत किरण पाटील ,चांगाप्पा बाचोळकर,बाळाराम निलजकर हे एकमेव उमेदवार विजयी झाले आहेत.
महिला कर्जदार गटातुन सुनिता पाटील या विजयी झाल्या आहेत. तर “अ” वर्ग गटातुन सुभाष कुंभार तर विष्णू पाखरे यांची बीन कर्जदार गटातुन निवड झाली आहे. एस सी गटातुन बसवंत इदलहोंडकर निवडुण आले आहेत.
बिनविरोध झालेल्या निवडणुकीत एसटी गटातुन चन्नाप्पा बाळन्नावर तर “ब” गटातुन संजय जाधव हे विजयी झाले आहेत.
तर विरोधी गटातुन सामान्य कर्जदार उमेदवार म्हात्रू धबाले व नामदेव पाखरे ,महिला रूक्मिणी गुरव हे तीघेजन निवडुण आले आहेत.
यावेळी माजी आमदार डीसीसी बॅक संचालक अरविंद पाटील यानी बाचोळकर पॅनलचे पुष्पहार घालुन व गुलाल उधळुन अभिनंदन केले.
यावेळी बाचोळकर पॅनलचे विजयी उमेदवार माजी ग्राम पंचायत अध्यक्ष व विद्यामान सदस्य चांगाप्पा बाचोळकर यानी माजी आमदार व डीसीसी बॅक संचालक अरविंद पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊण स्वागत केले.