
#जांबोटी भागात झांडाच्या फांद्या तुटून पडल्या!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात उष्णतेने नागरीक हैराण झाल्याने पावसाच्या प्रतिक्षेत होते.
मंगळवारी दि २५ रोजी सायंकाळी वळीवाच्या पावसाने दमदार हजेरी लावली .आणि नागरीकाना दिलासा मिळाला.
यंदा खानापूर तालुक्यात पहिलाच वळीवाचा पाऊस मंगळवारी झाला. सध्या तालुक्यात वीटव्यवसायाला उशीरा सुरूवात झाली आहे.त्यामुळे कच्च्या वीटांचे नुकासान झाले आहे.
जांबोटी भागात वळीवाच्या पावसाने चांगलीच हजेरी लावली .त्यामुळे जांबोटी मार्गावर झाडांच्या फांद्या पडून वाहनधारकाना अडथळा निर्माण झाला.
गेल्या अनेक दिवसापासुन वळवाच्या प्रतिक्षेत असलेल्या नागरीकाना मंगळवारी दिलासा मिळाला.