
#पत्रकार परीषेदत सौ. धनश्री सरदेसाई जांबोटकर यांची माहिती!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील )
खानापूर तालुक्यातील जांबोटी राजवाडा येथे शिवस्मारक उभारणीचे काम घेण्यात आले आहे. शिवस्मारक उभारणी बरोबर चौथार्याखाली सार्वजनिक वाचनालय करण्यात येणार आहे. या शिवस्मारकाच्या उभारणीच्या वेळी मोठी आर्थिक मदत मिळावी म्हणून जांबोटी गावच्या नवयुवक नाट्य मंडळाच्या वतीने “एकच प्याला ” हा नाट्यप्रयोग शनिवारी दि.२६ एप्रिल रोजी खानापूर शहरापासुन जवळ असलेल्या खानापूर जांबोटी रोडवरील शुभम गार्डन येथे आयोजीत करण्यात आले आहे.
तरी नाट्य रसिकानी तसेच शिवप्रेमीकानी याचा लाभ घ्यावा.असे आवाहन सामाजिक नेत्या सौ धनश्री सरदेसाई जांबोटकर यानी गुरूवारी दि.१० रोजी खानापूर येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामधामात बोलविलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.
यावेळी बोलताना जांबोटी हायस्कूलचे मुख्याध्यापक महेश सडेकर म्हणाले की खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात नाट्य रसिक तसेच नाट्य कलाकार मोठ्या प्रमाणात आहे.त्याच्या पुढाकाराने जांबोटी नाट्यकलाकारानी स्वत: ” एकच प्याला ” नाटकात पात्र उभारून हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आहे.
तेव्हा खानापूर तालुक्यासह बेळगाव जिल्ह्यातील नाट्यकलाकारीनी दि.२६ रोजी होणार्या नाट्यप्रयोगाला मोठ्या संख्येने उपस्थिती लावावी.असे आवाहन त्यानी केले.
जाबोटीत उभारणार्या शिवस्मारक चौथार्या उभारण्यासाठी देणगी शुल्क आकारणी करून “एकच प्याला ” नाट्यप्रयोग तिकीटाव्दारे सादर कण्यात येणार आहे.अशी माहिती दिली.
पत्रकार परीषदेला सामाजिक नेत्या सौ.धनश्री सरदेसाई जांबोटकर,जांबोटी हायस्कूल मुख्याध्यापक महेश सडेकर, चंद्रकांत देसाई, सुरेश कळेकर, व माजी सीआरपी गोविंद पाटील आदी उपस्थित होते.