
संदेश क्रांती न्यूज:
खानापूऱ (सुहास पाटील )
जांबोटी ( ता.खानापूर ) येथील वनदेवी मल्टीपर्पज को.आँप.सोसायटीच्या वतीने काॅग्रेस पक्षाने खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्षपदी अँड .ईश्वर घाडी यांची नेमणुक केल्याबदल बुधवारी दि.६ रोजी सोसायटीच्या सभागृहात सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण कसर्लेकर होते.
सत्कार मुर्ती खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी यांचा संस्थेेचे अध्यक्ष लक्ष्मण कसर्लेकर व संचालक पुंडलिक पाटील यांच्याहस्ते शाल ,श्रीफळ व भेटवस्तू देऊन भव्य असा सत्कार करण्यात आला.
.यावेळी सत्काराला उत्तर देताना खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी म्हणाले की, अध्यक्षपदाची संधी माझ्या नेत्या व सर्वस्वी माजी आमदार व आखील भारतीय काॅग्रेस कमिटीच्या कार्यदर्शी व गोवा इनचार्ज डाॅ.अंजलीताई निंबाळकर यानी दिली.त्यामुळे त्यांचे मी शतषा ऋणी असल्याचे सांगीतले.
त्याचबरोबर जांबोटी भागातील सर्व समस्यांची जाणीव मला माहिती आहे.तेव्हा समस्या सोडविण्यासाठी तुमच्या पाठीशी सदैव सेवेसाठी उभा राहिण. व संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले.
यावेळी अक्रम सक्रम समितीच्या सदस्या दीपा दिपक कवठणकर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला काॅग्रेसचे महादेव घाडी,राजू पाटील, दिपक कवठणकर, वनदेवी सोसायटीचे संचालक पुंडलिक पाटील,दर्शन पाटील,परशराम गावडे,आप्पाणा गावडे,बसवंत नाईक,मिलीग्रीस मेन्डोसा व इतर संचालक मंडळ उपस्थित होते.
यावेळी संचालक पुंडलिक पाटील यानीआभार मानले.