
# तानाजी पाटील उत्तुर (ता.गडहिंग्लज)यांचा देवमामा जागरण ,रेणूका कथा यांचा रात्री कार्यक्रम होणार!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
जटगे (ता.खानापूर ) येथील श्री हनुमान मंदिराचा दुसरा वर्धापन दिन गुरूवारी दि.२० रोजी सकाळी १०वाजता आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त अभिषेक,
होमवहन पुजन व दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक पुंडलिक पाटील उपस्थित राहाणार आहेत.
दीपप्रज्वलन आमदार विठ्ठल हलगेकर, माजी जि.पं.सदस्य बाबूराव देसाई, जोतिबा रेमाणी, यादव पाटील (पुजारी),महाबळेश्वर पाटील जटगे,संजय कुंबल माजी तालुका अध्यक्ष भाजपा,प्रमोद कोचेरी भाजप जिल्हा उपाध्यक्ष, सदानंद पाटील एम डी,हेमंत देसाई,भरमाणी पाटील,रामचंद्र देसाई,पांडुरंग पाटील आदीच्याहस्ते होणार आहे.
यावेळी कार्यक्रमाला विविध मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे औचित्य साधुन रात्री ९ वाजता महाप्रसादा नंतर तानाजी पाटील उत्तूर (ता.गडहिंग्लज) यांचा देवमामा जागरण ,रेणूका कथा यांचा रात्री कार्यक्रम होणार!
तरी भाविकानी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्राम पंचायत सागर पाटील (जटगे )यानी केले आहे.