
#विविध मान्यवरांची उपस्थिती!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
जटगे (ता.खानापूर) येथील हनुमान मंदिराचा दुसरा वर्धापन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक पुंडलिक पाटील होते.
प्रारंभी सकाळी हनुमान अभिशेक होम हवन होऊन कार्यक्रमला सुरवात झाली.
यावेळी दीपप्रज्वलन व क्षत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो पुजन करून सुरवात करण्यात आली
यावेळी कार्यक्रमला खानापूर तालुका भाजप माजी अध्यक्ष संजय कुबल,जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद काचोरी . कापोली ग्राम पंचाय माजी अध्यक्ष संदीप देसाई ,तुकाराम गावडा हलसाल, गोपाळ कुट्रे, हेंमत देसाई, बाबा देसाई ,कृष्णराव देसाई ,,धारापा पाटील पांडुरंग पाटील कल्लापा मळीक प्रतिक हलशीकर पवण पाटील आंदीची भाषणे झाली.
सुत्रसंचालन नरसिंग हलशीकर व सागर पाटील यांनी केले.
यावेळी हलसाल जटगे रस्त्याची दुरूस्ती येत्या एप्रिल पर्यत होईल . अशी आठवण राजकीय नेत्यानी करून दिली.
कार्यक्रमाला उपस्थित गावातील पाहुणे मंडळी युवा वर्गानी उत्तम सहकार्य केले. माहेर वासीनींची उपस्थिती होती. वर्धापण क्रार्यक्रमला ज्या ज्या भकतांनी महाप्रसाद ला धान्य स्वरूपात व आर्थिक स्वरूपात मदत केली त्या सर्व भक्तांचे अभार मानले महाप्रसाद ला पंचक्रोशीतील भाविकांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती.
शेवटी ग्राम पंचायत सदस्य सागर पाटील यानी आभार मानले.