
#३ किलो मीटर अंतर रस्त्याची दैयनिय आवस्था!
संदेश क्रांता न्यूज :
खानापूर (सुहास पाटील)
खानापूर तालुक्यातील जटगे हलसाल रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य पसरल्याने रस्त्याची दैयनिय आवस्था झाली आहे.
नंदगडला जाण्यासाठी हा तीन किलो मीटर अंतरचा एकमेव रस्ता आहे. याच रस्त्याने शाळेचे विद्यार्थी रोज येजा करतात.
खराब रस्त्यामुळे बसेस बंद! विद्यार्थ्याचे हाल!
जटगे गावाला येणारी बस रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याच्या साम्राज्यामुळे बससेवा बंद झाली . त्यामुळे विद्यार्थ्याना शाळेला जाताना तीन किलो मीटरचा प्रवास पायीच करावा लागत आहे.
या रस्त्याची दुरावस्था पाहता गावचे नागरीक कामानिमित्त गावाबाहेर गेले त्यानी या रस्त्याकडे गांभीर्याने पाहणे गरजे आहे.
तेव्हा जटगे हलसाल रस्त्याच्या दुरूस्ती साठी तालुक्याच्या लोकप्रतिनिधीकडे तसेच संबधीत खात्याच्या अधिकार्याकडे जाब विचारून रस्त्याच्या कामाला चालणा मिळावी .अशी मागणी जटगे गावच्या ग्रामस्थातुन होत आहे.
रस्त्याच्या दुरूस्तीकडे लवकरात लवरकर लक्ष द्या. ग्राम पंचायत सदस्य सागर पाटील.
जटगे हलसाल या तीन किलोमीटर रस्त्याची झालेली दैयनिय आवस्था पहाता संबधीत अधिकार्यानी लवकारात लवकर रस्त्याच्या दुरूस्तीचे काम हाती घेणे अत्यंत गरजेचे आहे.