
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}
#संस्थापक वाय.एन.मजुकर यांची उपस्थिती!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
कारलगा ( ता .खानापूर ) येथील
श्री चांगळेश्वरीशिक्षण मंडळ संचलित कारलगा हायस्कूल कारलगाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ सोमवार दि.१० रोजी सकाळी अकरा वाजता मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वाय एन मजुकर उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अमृत महादेव शेलार चेअरमन अर्बन बँक तसेच व्हाईस चेअरमन मेघशाम घाडी आणि भाजपा युवा नेते प्रशांत लकैबैलकर आणि श्री चागंळेश्वरी शिक्षण संस्थेचे सचिव प्रसाद मजुकर आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक मुख्याध्यापक ए.एम पाटील यानी केले.तर उपस्थितांचे स्वागत शेखर पाटील यानी केले.
कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलन व फोटो पुजनाने झाली.
यावेळी मजुकर म्हणाले की विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात ध्येय धोरण ठेवले पाहिजेत व त्याप्रमाणे नियोजन करून आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे विचार मांडले .प्रमुख वक्ते एम पी गिरी हे होते .
सन २०२३-२४ सालातील दहावीच्या वार्षिक परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले त्यांना अनंत शामराव जाधव रिटायर्ड पीएसआय यांच्याकडून अनुक्रमे पहिले दुसरे तिसरे बक्षीस देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ एम एम लोहार यानी केले. तर आभार आर एन घाडी यांनी मानले .
यावेळी गावातील शिक्षण प्रेमी नागरिक मनोहर ना पाटील , अरुण रामचंद्र नलावडे रंजीत मल्लू पाटील, गणपतराव कलापा पाटील, गणपती धोंडीबा पाटील ,आप्पाजी पाटील , रामांना दे पाटील. पालक वर्ग शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.