
संदेश क्रांती न्यूज :
श्रीमती सुभद्रा नारायण भोसले यांचे रविवारी दि. ८ रोजी अल्पशा आजाराने वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झाले.
आज बाराव्या दिनी थोडक्यात परियच:
श्रीमती सुभद्रा नारायण भोसले याचे जन्मभूमी आणि कर्मभूमी दोन्हीही कौंदल
( ता.खानापूर ) असुन कै.तानाप्पा मष्णू पाटील यांची मोठी मुलगी होय.त्याचा विवाह कौंदल गावातील कै.नारायण रूद्रापा भोसले यांच्याशी लहान वयातच झाला. त्यामुळे लहानपणापासुनच घरची व शेतीची जबाबदारी त्याच्यावर पडली.
आईचा स्वभाव शांत व मनमिळावू . कौंदल गावात परमपुज्य कलावती आईंच्या भक्तीचा मार्ग सुरू केला.त्यामुळे असंख्य भाविकाना भक्ती मार्गाकडे नेण्यात त्यानी पुढाकार घेतला.
आपल्या शेतीच्या कामात व घरच्या कामात आई खूप मेहनत घेत असत.शेती कामाबरोबर भजनाची आवड होती.त्यामुळे आई रोज न चुकता रात्रीच्यावेळी कलावतीच्या भजन जात असत.त्याचबरोबर गावातील सार्वजनिक कामात आवडीने पुढाकार घेऊन सहभागी होतअसत.
संसारमध्ये हातभार लावून आज सर्वांना सोडून ही माता देवाघरी निघून गेली.त्यांच्या आत्म्याला चिर शांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना!
तुझाच मुलगा उदय.