
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूरचे माजी आमदार कै. व्ही.वाय.चव्हाण यांच्या पत्नी व खानापूर रेल्वेस्टेशन रोड येथील रहिवाशी अन्नपूर्णा विठ्ठलराव चव्हाण (वय.८७) याचे आज रविवारी दि. २३ रोजी पहाटे ६.३० वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
त्याच्या पश्चात चार कर्ते चिरंजीव ,दोन विवाहित मुली,सुना,जावई ,नातवडे ,पतवंडे असा परिवार आहे.
खानापूर तालुका महाराष्ट्र एकिकरण समितीचे माजी आमदार कै.व्ही वाय चव्हाण यांच्या पत्नी होत.तर समितीचे नेते प्रकाश चव्हाण यांच्या त्या मातोश्री होत.
अंत्यसंस्कर आज दुपारी ४ वाजता खानापूर येथील स्मशानभूमीत होणार आहेत.
त्या महाराष्ट्र एकिकरण समितीच्या चळवळीत पती माजी आमदार कै.व्ही वाय चव्हाण यांच्या सोबत सहभागी झाल्या होत्या.