
#९९ पात्र महिला विद्यार्थ्यासाठी ८लाख ९४ हजार रू.शिष्यवृत्ती!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात ९९ पात्र महिला विद्यार्थ्यासाठी ८लाख ९४ हजार रूपयाची शिष्यवृत्ती बेळगावच्या मलबार गोल्ड अँड डायमंड् च्या सीएसआर योजनेअंतर्गत गुरूवारी दि.२७ रोजी सकाळी ११ वाजता खानापूर जांबोटी रोडवरील शानया पाम्स हाॅलमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विठ्ठलराव हलगेकर, धनश्री सरदेसाई सरचिटणीस भाजपा बेळगांव ग्रामिण, बीईओ पी रामाप्पा ,खानापूर तालुका केएएफ माजी संचालक संतोष नारायण पाटील (कारलगा) आदी उपस्थित राहणार आहेत.
तेव्हा सर्वानी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.