
#नगराध्यक्षा सौ.मिनाक्षी प्रकाश बैलुरक यांच्याहस्ते स्वागत!
#तालुका अधिकार्यांची दांडी!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
भारतातील पहिली एकमेव महिला की जीने सैन्याचे नेतृत्व केले.आणि ब्रिटीशाविरूध्द लढा दिला. या वीर महिला बेळवडी मल्लमाच्या वीरज्योतीचे स्वागत बुधवारी दि.२६ रोजी सायंकाळी खानापूर शहरातील शिवस्मारक चौकात तालुका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले.
प्रारंभी नगरपंचायतीच्या नुतन नगराध्यक्षा सौ.मिनाक्षी प्रकाश बैलुरकर यांच्या हस्ते पुष्पहार आर्पण करून पुजनाने वीर ज्योतीचे स्वागत करण्यात आले.
त्यानंतर उपनगराध्यक्ष सौ जया भुक्ती यानी पुजन केले.
यावेळी माजी स्थायी कमिटी चेअरमन व विद्यामान नगरसेवक प्रकाश बैलुरकर ,नारायण ओगले,लक्ष्मण मादार, आप्पय्या कोडोळी,सह इतर नगरसेवक उपस्थित होते.
यावेळी नगरपंचायतीचे अंभियंते श्री कांबळे , प्रेमानंद नाईक ,राजू जांबोटकर ,अल्ताफ आदी कर्मचारी उपस्थित होते.
वीरज्योतीच्या स्वागताला तालुका अधिकार्यांची दांडी!
खानापूर शहरात बेळवडी मल्लम्मा वीर ज्योतीचे बुधवारी सायंकाळी स्वागत झाले.
मात्र वीर ज्योतीच्या स्वागताला तहसीलदारासह तालुक्यातील तालुका अधिकारांनी दांडी मारली होती.
त्यानंतर बेळवडी मल्लाम्मा वीरज्योतीचा खानापूर मुक्काम राहिला.