
#उपतहसीलदार के.आर.कोलकार व प्रकाश कट्टीमनी इतरानी केले स्वागत!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तहसीलदार पदी दुंडाप्पा कोमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानी गुरूवारी दि २७ रोजी आपल्या पदाची सुत्रे स्विकारली.
तहसील तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्यावर लोकायुक्तांचा छापा पडल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले होते.
मात्र प्रकाश गायकवाड यानी या कारवाईवर स्थगिती आणली होती. मात्र राज्यातील १९ तहसीलदारांच्या बदल्याचे आदेश महसुल खात्याच्यावतीने काढण्यात आले आहेत.यामध्ये दुंडाप्पा कोमार यांच्या समावेश आहे. सध्या ते यादगीर जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रेड टू तहसीलदार म्हणून कार्यरत आहे.
तसेच अथनीचे तहसीलदार म्हणून काम केले आहे.
तहसीलदार दुंडाप्पा कोमार यानी खानापूर तालुक्याचे तहसीलदार म्हणून गुरूवारी दि.२७ रोजी पदभार स्विकारला.
तहसीलदार दुंडाप्पा कोमार यानी पदभार स्विकारताच उपतहसीलदार के आर कोलकार व प्रकाश कट्टीमनी तसेच कर्मचार्यानी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.