
#विद्यार्थ्यानी शहरात फिरून केली जागृती!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
दरवर्षी आपल्या देशात १० लाख लोक तंबाखू, गुटखा, दारू, ड्रग्स च्या व्यसनाने बळी पडतात. व्यसनमुक्त समाजात जागृती निर्माण होणे काळाची गरज आहे. जेणे करून कुटुंबाची आणि देशाची मोठी हानी रोखता येते. असे विचार श्री स्वामी विवेकानंद इंग्रजी हायस्कूलचे चेअरमन अँड.चेतन मणेरीकर यानी
श्री.स्वामी विवेकानंद इंग्रजी माध्यम हायस्कूलतर्फे शुक्रवारी दि. २८ रोजी
व्यसन मुक्ती जागृती अभियान शुभारंभाच्या वेळी व्यक्त केले.
यावेळी खानापूर शहरातील मुख्य रस्त्यावरून व्यसन मुक्ती अभियान राबविण्यात आले. शाळेच्या मुलांनी हातात जागृती फलक घेऊन, तसेच ध्वनीक्षेपकाद्वारे माहिती देऊन व्यसन मुक्ती अभियान राबविले. सदर अभियानाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
शहरातील सर्व गल्लीतुन जागृती काढुन पारिश्वाड क्राॅस ,जांबोटी क्राॅस वरून पणजी बेळगांव महामार्गावरून शिवस्मारक चौकातुन श्री स्वामी विवेकानंद इंग्रजी हायस्कूलमध्ये व्यसनमुक्ती जागृती फेरीची समाप्ती करण्यात आली .